इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
केळी आणि सोनू, मोनू
सोनू : रिकाम्या पोटी तू किती केळी खाऊ शकतो?
मोनू (क्षणभर विचार करून) : मी ६ केळी खाऊ शकतो.
सोनू (हसून) : चुकीचे उत्तर मित्रा,
पहिली केळी खाल्ल्यावर तुझे पोट कुठे रिकामे असेल?
म्हणून रिकाम्या पोटी आपण
फक्त एक केळी खाऊ शकता.
मोनू घरी पोहोचला. त्याने बायकोला विचारलं
रिकाम्या पोटी तू किती केळी खाऊ शकते?
बायको : मी ४ केळी खाऊ शकते..!
मोनू (निराश स्वरात) : जर तू ६ सांगितले असते तर
तुला एक मस्त जोक सांगितला असता..!!
– हसमुख