इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शेठजी आणि वर्गणी
(एक सामाजिक कार्यकर्ता शेठजीकडे येतो तेव्हा)
कार्यकर्ता – शेठजी नमस्कार.
शेठजी – नमस्कार
कार्यकर्ता – वर्गणी घेण्यासाठी आलोय
शेठजी – कसली वर्गणी
कार्यकर्ता – स्मशानाला कुंपण घालायचं आहे
शेठजी – स्मशानाला कुंपण घालण्याची काय आवश्यकता?
कार्यकर्ता – शेठजी म्हणजे
शेठजी – अरे दादा. स्मशानाच्या आत गेलेला माणूस
काही बाहेर पळून येत नाही
– हसमुख