इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जागेसाठी भांडण
सिटी बसमध्ये गर्दी असते.
तेवढ्यात एक तरुणी चढते आणि पुढे जाते.
तेवढ्यात एकाच सीटसाठी दोन तरुणी भांडत असतात.
बसमधील प्रवाशांचे लक्ष त्यांच्याकडे जाते.
अखेर कंडक्टर त्याची दखल घेतो.
कंडक्टर – अरे कशाला भांडताय.
जिचे वय जास्त आहे तिने बसून घ्या
मग काय,
दोन्ही तरुणींनी संपूर्ण प्रवास उभा राहूनच केला
– हसमुख