इंडिया दर्पण – हास्य षटकार – शाळेचं इन्स्पेक्शन सुरू असते तेव्हा
(शाळेत इन्स्पेक्शनसाठी साहेब येतात आणि ते चौथी क च्या वर्गात जातात)
मुरकुटे साहेब – अरे मुलांनो, मी एक प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्या पाहू
सर्व विद्यार्थी (एकाचवेळी) – हो सर
मुरकुटे साहेब – या दुसऱ्या रांगेत बसलेला तिसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी. उभे रहा पाहू
पिंट्या (उभा राहतो आणि म्हणतो) – यस सर
मुरकुटे साहेब – सांग बरं, एखाद्या वैज्ञानिकाचे नाव
पिंट्या – आलिया भट्ट
मुरकुटे साहेब (मोठ्या आवाजात) – काय? आलिया भट्ट? हे एका वैज्ञानिकाचे नाव आहे?
हे पाहून वर्गशिक्षक शेनपडे मास्तर म्हणतात – साहेब, तो बोबडा आहे.
त्याला आर्यभट्ट असं म्हणायचं आहे
(मुरकुटे साहेब अत्यंत खुष होऊन इन्स्पेक्शन झाले असे सांगत शाळेबाहेर पडतात)
– हसमुख