इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
विज्ञानाचे शिक्षक आणि संजू
विज्ञानाचा तास सुरू असतो.
तेव्हा गुरुजी विद्यार्थ्यांना सांगतात की,
मुलांनो, मी तुम्हाला पक्ष्यांची सविस्तर माहिती दिली आहे.
आता तुम्ही पक्ष्यांचे पाय बघून त्यांचे नाव सांगा.
त्यानंतर शिक्षक फळ्यावर एका पक्ष्याचे पाय काढतात.
आणि विचारतात
शिक्षक – संजू, उभे रहा
संजू – हो सर
शिक्षक – सांग बरं, हे पक्ष्याचे पाय नीट बघून
ओळख हा पक्षी कोणता आहे?
संजू – सर, नाही माहित
शिक्षक – अरे असं कसं नाही माहित.
मी एवढं व्यवस्थित समजावून सांगितलं.
ते सगळं वाया गेलं का.
तुझं काय नाव आहे
संजू – सर, माझे पाय बघून तुम्हीच ओळखा ना माझे नाव
– हसमुख
joke hasya shatkar schence teacher and sanju student