इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जेव्हा संता उदास असतो
एके दिवशी संता खुपच उदास बसला होता…
त्यावेळी त्याला बंता भेटतो.
बंता : काय झालं? एवढा उदास का बसला आहेस…?
संता : काय सांगू यार, कुणीतरी म्हटलं की,
झाडापासून आपल्याला ‘शीतल छाया’ मिळते.
बंता : हो मग खरंच आहे…
संता : मी इथे तीन दिवस झाडाखाली बसलोय.
पण ना शीतल आली, ना छाया…!
– हसमुख