इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
संजू आणि स्मार्टफोन
संजूला त्याचा मित्र भेटतो.
तेव्हा दोघांमध्ये गप्पा रंगतात
संजूच्या हातातला नवा फोन पाहून…
त्याचा मित्र म्हणतो
मित्र – तू हा नवीन स्मार्टफोन कधी घेतलास?
संजू – नवीन नाही, मैत्रिणीचा आहे.
मित्र – मैत्रिणीचा? आणि तू का घेतलास?
संजू – अरे यार,
ती रोज म्हणायची,
माझा फोन उचलत नाहीस,
फोन उचलतच नाहीस
आज संधी मिळाली
आणि उचलून घेऊन आलो…
– हसमुख