इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
फटाक्यांसाठी झुंबरे काकांची युक्ती
(पांड्या काका आणि संप्या काका दोघे गप्पा मारत असतात)
पांड्या काका – अरे संप्या,
दरवर्षी दिवाळीला महागडे फटाके
घ्यावे लागतात. हजारो रुपयांची झळ पोहचते रे.
कधी सुटका होईल यापासून…
संप्या काका – मी तर एकदाच दिवाळीला
५० रुपये खर्च केले. त्यामुळे आता मला
कुठल्याही दिवाळीला फटाक्यांचा खर्च येत नाही.
पांड्या काका – अं. असं काय केलं रे तू.
की आता खर्चच येत नाही.
संप्या काका – काही नाही.
मी बाजारात गेलो
आणि
फटाक्यांचा आवाज असलेली
एक सीडी खरेदी केली.
आता दरवर्षी दिवाळीला
आमच्या ओट्यावर मी
सीडी प्लेअरवर ती सीडी लावतो.
होतो मग नुसताच आवाज…
– हसमुख