इंडिया दर्पण – हास्य षटकार – साहेब, कर्मचारी आणि पगार
(लांडगे साहेब आणि कर्मचारी यांच्यातील संवाद)
लांडगे साहेब – सर्व कर्मचाऱ्यांनो,
हे बघा
अधिक महिना
सुरू झाला आहे.
तेव्हा सासरवाडीला जायचं आहे
म्हणून
कुणीही सुटी मागायची नाही
किंवा
परस्पर दांडी मारायची नाही.
कोल्हे (कर्मचारी) – साहेब, कृपया
एक विचारु का
लांडगे साहेब – हो हो,
विचारा ना
कोल्हे – नाही म्हणजे
अधिक महिन्याचा पगार
हा या पगारासोबत
मिळणार आहे
की
वेगळा मिळणार
– हसमुख