इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मास्तरांना प्रश्न
शाळेमध्ये मास्तर विज्ञान विषय शिकवित असतात.
त्यावेळी ते विविध उदाहरणे देत असतात.
ते म्हणतात की, कुणाला काही शंका असतील तर विचारा
त्याचवेळी बंड्या हात वर करतो
बंड्या – मास्तर, जो सकाळी लवकर उठतो
तो खुप वर्ष जगतो असे तुम्ही म्हटलात.
पण, ते किती खरं आहे?
मास्तर – शंभर टक्के खरं आहे…!
बंड्या – कसं काय. मग, कोंबडा तर दररोज सकाळी
लवकर उठतो आणि बांग देतो.
पण, तो तर सर्वांच्या आधी मरतो.
हे कसं…???
(मास्तर बेशुद्ध झालेत. शुद्धीवर आले की उत्तर देतील)
– हसमुख