इंडिया दर्पण – हास्य षटकार – पुंडलिकराव जेव्हा ज्योतिषाकडे जातात
पुंडलिकराव आपल्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीला वैतागतात.
काय करावे त्यांना सूचत नाही.
रस्त्याने चालत असताना त्यांना एक ज्योतिषी दिसतो.
तत्काळ ते त्याच्याकडे जातात.
आपला हात त्याच्या पुढे करतात.
ज्योतिषी – अरे व्वा. काय हस्तरेषा आहेत.
खुपच भाग्यवान आहात तुम्ही.
तुमच्या नशिबात तर पैसाच पैसा आहे.
पुंडलिकराव – व्वा. बरं मग तो पैसा माझ्या बँक अकाऊंटमध्ये
जमा झाला की
तुमची फी सुद्धा देतो हं….
– हसमुख