इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पुणेरी काका आणि रिक्षा
पुणेरी काका बाजारात जात असतात.
रस्त्यावर उभे राहून ते रिक्षाला हात देतात.
अखेर एक रिक्षा थांबते.
ते रिक्षात बसतात.
त्यानंतर काही वेळाने
पुणेरी काका – अरे, रिक्षा का थांबवत नाहीस.
मला तर त्या बाजारात जायचे होते…
रिक्षाचालक – अहो, काका, रिक्षाचे ब्रेक फेल झाले आहेत. आता काय करु
पुणेरी काका – रिक्षाचं काय व्हायचं ते होऊ दे.
आधी रिक्षाचं मीटर बंद कर पाहू
– हसमुख