इंडिया दर्पण – हास्य षटकार – पुणेरी मित्र आणि चहा
एकदा सोनू त्याच्या मित्राला भेटण्यासाठी
पुण्यात जातो. तो आधी चिन्याला भेटतो.
तेथेच या दोघांना त्यांचा जिवलग मित्र बंटी भेटतो.
बंटी आता पूर्णपणे पुणेकर झालेला असतो.
तिघांच्या गप्पा रंगतात.
त्यानंतर बंटी दोघांनाही घेऊन आपल्या घरी येतो.
काही क्षणातच बंटी म्हणतो,
“थांबा मी चहा घेऊन आलो…”
१० मिनिटांनी तो हॉलमध्ये येतो आणि म्हणतो,
“चला, माझा चहा घेऊन झाला, आपण आता जाऊया!”
– हसमुख








