इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
प्लास्टिक बंदी
(महापालिकेचे अधिकारी शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यास आलेले असतात तेव्हा)
अधिकारी दुकानात जातात
आणि
प्लास्टिक बंदी असल्याचे सांगत
दुकानदाराला दंड करतात.
थोडे पुढे जातात.
तेथे एक ग्राहक प्लास्टिक पिशवी घेऊन जात असतो.
त्यालाही ते पकडतात आणि दंड करतात.
त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू होतो.
तातडीने अधिकारी एका दुकानाच्या शेडखाली थांबतात.
आपल्या खिशातील मोबाईल आणि
पैशाचे पाकिट बाहेर काढतात.
दुकानदाराला म्हणतात,
मोबाईल आणि पाकिट ठेवण्यासाठी
प्लास्टिकची पिशवी द्या ना
– हसमुख