इंडिया दर्पण – हास्य षटकार – पिंट्याची वर्गातली डुलकी
(शाळेचा वर्ग सुरू असतो. लढे मास्तर शिकवित असतात तेव्हा)
लढे मास्तर – पोरांनो, मी काय सांगतोय,
हे लक्षात येतंय ना तुमच्या…
सर्व पोरं जोरात हो हो हो म्हणतात
लढे मास्तर – ठीक आहे. पण,
अरे पिंट्या तू वर्गात डुलक्या का घेतोयस..?
(पिंट्या डुलकीच घेत असतो. तेवढ्यात
त्याच्याच बाकावर बसलेला
जित्या त्याला जोरदार हाताचा कोपरा मारतो.
पिंट्याला खडबडून जाग येते.)
पिंट्या – नाही मास्तर. मी काहीच नाही केलं
लढे मास्तर – अरे नाही कसं. तू डुलक्या का घेतोयस..?
पिंट्या – अच्छा. त्याबद्दल म्हणताय.
लढे मास्तर – मग, आणखी कशाबद्दल विचारणार. सांग लवकर
पिंट्या – अहो मास्तर, काही नाही
ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे
माझं डोकं खाली पडतंय एवढंच..!!!!!
(है ऐकून लढे मास्तरांचंही डोकं खाली पडायला लागलं)
– हसमुख