इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पिंट्या आणि जिलेबी विक्री
पिंट्याला त्याचे कुटुंबिय खुप बोलतात.
काही तरी कामधंदा कर असे सांगत असतात.
अखेर तो निर्णय घेतो जिलेबी विक्री करण्याचा..
पिंट्या बाजारात हातगाडीवर
जिलेबी विक्री करत जात असतो.
त्यावेळी तो ओरडत असतो
“बटाटे घ्या, बटाटे घ्या…!”
त्याचवेळी तेथून एक व्यक्ती जात असतो.
तो म्हणतो,
अरे ही तर जिलेबी आणि तू बटाटे का ओरडतोय
पिंटू म्हणतो,
गप्प बस! नाहीतर माश्या येतील.
– हसमुख