इंडिया दर्पण – हास्य षटकार – रुग्ण, डॉक्टर आणि ऑपरेशन
(ऑपरेशन थिएटरमधील रुग्ण आणि डॉक्टर यांचा संवाद)
डॉक्टर – घाबरु नका काळे,
सारं काही
ठीक होईल.
छोटेसे तर
ऑपरेशन आहे.
रुग्ण – धन्यवाद डॉक्टर.
पण, माझं आडनाव
गोरे आहे.
तुम्ही काळे का
म्हणत आहात.
डॉक्टर – हो हो,
मला ठाऊक आहे
तुम्ही गोरे आहात.
काळे हे माझं आडनाव आहे.
पण, त्याचं काय आहे
की,
हे माझं
पहिलंच ऑपरेशन आहे ना….
– हसमुख