इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्लास्टिक सर्जरीचा दर
(स्थळ अर्थातच पुणे. त्याशिवाय दुसरे असूच शकत नाही)
पेशंट:- डॉक्टर साहेब, मला प्लास्टिक सर्जरी करायची आहे.
डॉक्टरः हो हो करता येईल. आपल्या हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा आहेत.
पेशंटः साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर: ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून): एवढा?
डॉक्टरः हो मग. आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानही आहे.
पेशंटः आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?
किती खर्च येईल?
(हे ऐकून डॉक्टरांना भोवळ आली. अजून ते शुद्धीवर आलेले नाहीत)
– हसमुख