इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पप्पू आणि अप्सरा
पप्पू अतिशय कठोर तपश्चर्या करतो.
ते पाहून स्वर्गातील अप्सरा प्रकट होते.
अप्सरा – तुला काय हवे आहे ते माग
पप्पू – मस्त गाडी, आरामदायी आयुष्य, बहुरंगी परींमध्ये घालवलेले आयुष्य…
अप्सरा – अजून काय हवे…
पप्पू – काही नाही…
अप्सरा – विचार कर…
अजून काही हवं असेल तर…
कारण वर मागण्यासाठी तुला
पुन्हा एवढी तपश्चर्या करावी लागेल…
पप्पू – विचार केला पण, कशाची गरज नाही…
अप्सरा – तथास्तु!
(अप्सरा गायब झाली…)
काही दिवसांनी…
पप्पू मुलींच्या कॉलेजमध्ये
बस कंडक्टरची नोकरी करताना दिसला…
– हसमुख