इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पाहुण्यांना मुलगी पसंत पडते तेव्हा….
(मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो)
नांद्रेंची कन्या चिंगीला
बघण्यासाठी
पाहुणे येतात.
पाहुण्यांना चिंगी
पसंत पडते.
मुलाकडचे होकार
देणारच होते.
तेवढ्यात….
किचनमधून
चिंगीचा आवाज येतो
“आई, कॉफीसाठी किती शिट्ट्या?”
हे ऐकून
पाहुणे मंडळी
५८०च्या वेगाने
सुसाट पळाली…
– हसमुख