इंडिया दर्पण – हास्य षटकार – खरा हापूस आंबा
(ग्राहक हापूस आंबा घेण्यासाठी येतो तेव्हा)
श्री. खरे (ग्राहक) – हापूस, ओरिजिनल आहे ना रत्नागिरीचा
श्री. खोटे (विक्रेता) – हो मग, अस्सल रत्नागिरीच आहे
श्री. खरे – पेटी उघडून दाखवा बरं.
खरंच ओरिजिनल रत्नागिरी हापूस
आहे की नाही…
(श्री. खोटे पेटी उघडून दाखवच असतात तेव्हा)
श्री. खरे – व्वा. ओरिजिनल रत्नागिरी हापूसच आहे.
श्री. खोटे – तुम्ही लांबूनच कसं ओळखलं
श्री. खरे – अहो, आंब्याच्या पेटीतला
वर्तमानपत्राचा कागद पाहिला.
तो रत्नागिरीचा दिसला.
त्यामुळे माझी खात्री झाली.
(असे म्हणत श्री. खरे. कॉलर उडवतात)
श्री. खोटे (मनातल्या मनात) – काही फुशारकी मारु नको.
रद्दी फक्त रत्नागिरीची आहे,
आंबा मात्र इथलाच आहे…
– हसमुख