इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरा-बायकोचे भांडण
(एका कार्यक्रमात नवऱ्याला
एक प्रश्न विचारला…)
तुमचं आणि तुमच्या बायकोचं भांडण झालं
आणि
तिने तुमच्याशी बोलणं बंद केलं
तर तुम्ही काय करता?
मी सरळ किचनमध्ये जातो
आणि
सर्व बरण्यांची झाकणं
घट्ट बंद करुन येतो.
थोड्या वेळाने आवाज येतो..
अहो, त्या बिछान्यावर लोळत
काय पडलात…
इकडे या,
हे बघा,
या बरणीचे झाकणं
उघडत नाहीय….
– हसमुख