इंडिया दर्पण – हास्य षटकार – नशा येणारा पदार्थ
शिक्षिका शाळेत शिकवित असतात.
त्याचवेळी तंबाखू आणि धुम्रपानाचा विषय येतो.
त्याचअनुषंगाने शिक्षिका प्रश्न विचारते
शिक्षिका : मुलांनो, मला सांगा की, सर्वात जास्त नशा येणारा पदार्थ कोणता आहे?
गुड्डू : एकच आहे मॅडम
शिक्षिका : हो पण कोणता
गुड्डू : पुस्तक
शिक्षिका : कसं काय
गुड्डू : कारण, ते उघडताच झोप येते…!!
– हसमुख