इंडिया दर्पण – हास्य षटकार – मुला मुलीला पडलेले गुण
(भुऱ्याचे लग्न करायचे असते. त्याचे कुटुंबिय एका मुलीची पत्रिका घेऊन पंडितजींकडे जातात.)
पंडितजी पत्रिका बघून सांगतात ३६ पैकी ३६ गुण मिळताय.
उत्तम आहे स्थळ. काहीही हरकत नाही.
घरी आल्यानंतर कुटुंबिय मुलीकडच्यांना नकार देतात.
मुली कडच्यांना आश्चर्य वाटते,
“सगळेच्या सगळे गुण मिळाल्यावरही नकार का आला?”
मुलाकडचे सांगतात आमचा भुऱ्या एकदम बदमाश आहे.
त्यामुळे आता सूनही तशीच आणायची का?
– हसमुख