इंडिया दर्पण – हास्य षटकार – हे असतं मॉरल सायन्स
(मांढरे मास्तरांचा वर्ग सुरू असतो)
मास्तर – चला पोरांनो, आज आपण
मॉरल सायन्स विषयी
अधिक जाणून घेऊ…
मी एक प्रश्न विचारतो
त्याचे योग्य उत्तर द्या.
समजा रस्त्यात भला मोठा दगड असेल
तर तुम्ही त्यावेळी काय कराल?
चिंट्या – तो दगड दूर करण्यासाठी मी
तातडीने नगरपालिकेमध्ये फोन करेन
मास्तर – बरं, मिंट्या तू काय करशील बरं?
मिंट्या – मास्तर, तो दगड मी
बिलकूल दूर करणार नाही
मास्तर – का रे मिंट्या, असं का?
मिंट्या – मास्तर, असं म्हणतात की,
माणसं ही ठेच लागली की सुधारतात.
त्यामुळे माणसांना सुधारण्यासाठी
मी तो दगड तसाच राहू देईन
(हे ऐकून आता काय बोलावे हेच मांढरे मास्तरांना कळेना)
– हसमुख