इंडिया दर्पण – हास्य षटकार – आधुनिक रावण
फ्लॅटमध्ये बेल वाजते
आणि घरात एकटी असलेली बाई…..
दार उघडते…
भिक्षूक :- माई, भिक्षा द्या.
बाई :- हे घ्या सर…..
भिक्षूक :- माई…
फक्त हा दरवाजा ओलांडून बाहेर या.
(ती दार ओलांडून बाहेर येते.)
भिक्षूक :- (तिला पकडतो) हाहाहा…
मी भिकारी नाही, मी रावण आहे!
बाई :- हा… हा… हा…
मी कुठे सीता आहे?
मी कामवाली बाई आहे.
भिक्षूक :- हा..हा..हा..
सीतेचे अपहरण केल्याचा मला आजपर्यंत पश्चाताप होत आहे.
मी तुला नेले तर मंदोदरी खुपच खुश होईल.
तिला काम करणाऱ्या बाईची गरज आहे.
बाई :- हा…हा…हा…
सीतेला शोधायला फक्त रामच आला होता.
मला शोधायला मात्र संपूर्ण सोसायटी येईल.
सगळ्यांच्या फ्लॅटची दिवाळी साफसफाई बाकी आहे!
– हसमुख