इंडिया दर्पण – हास्य षटकार – मिंट्याने लावला भन्नाट शोध
(मिंट्या आणि त्याचे वडील हे बोलत असतात)
वडील – अरे बेटा मिंट्या, थोडं तरी डोकं चालवत जा ना.
मिंट्या – हो बाबा
वडील – का. हो. अरे डोकं चालवून चालवून शास्त्रज्ञांनी
अनेक मोठे शोध लावले
(मिंट्या हे सर्व शांतपणे ऐकून घेतो. दुसऱ्या दिवशी)
मिंट्या – बाबा, मी खुप डोकं चालवलं आणि
एक मस्त शोध लावला आहे.
वडील – अरे व्वा मिंट्या. कोणता शोध लावला तू
मिंट्या – बाबा, आपण बिना चप्पलचे चालू शकतो, पण
चप्पल आपल्याशिवाय चालू शकत नाही.
– हसमुख