इंडिया दर्पण – हास्य षटकार – मंत्री
नव्याने लग्न झालेल्या सूनेला सासूबाई घराची व्यवस्था समजून सांगत असते
हे बघ सूनबाई,
या घराची मी गृहमंत्री आहे.
त्याशिवाय अर्थमंत्रालयही माझ्याकडेच आहे.
तुझे सासरे हे परराष्ट्रमंत्री आहेत.
माझा मुलगा आणि तुझा नवरा हा
अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहे.
माझी मुलगी आणि तुझी नणंद ही
नियोजन मंत्री आहे.
आता तू सांग,
तू कुठलं विभाग सांभाळणार?
सूनेने हसून सांगितले,
ठीक आहे, मग मी विरोधी पक्षनेता होईल.
तुमच्या सर्वांचे सरकारच चालू देणार नाही.
– हसमुख