इंडिया दर्पण – हास्य षटकार – मालक, नोकर आणि डास
(दुकानात मालक बसलेला असतो आणि डास खुप त्रास देत असतात तेव्हा)
मालक – अरे झंप्या काय करतोय. डास एवढे त्रास देताय..
तू मारत का नाहीस लवकर…
झंप्या प्रचंड कंटाळलेला असतो त्यामुळे तो दुर्लक्ष करतो
(थोड्या वेळानंतर डास पुन्हा आणखी त्रास द्यायला लागतात)
मालक – अरे झंप्या. तुला डास मारायला सांगितले होते ना.
मारले नाही का डास…
झंप्या – अहो, शेटजी. डास तर केव्हाच मेले….
मालक – मग, एवढा त्रास का सुरू आहे
झंप्या – अहो, आता डासांच्या विधवा पत्नी रडत आहेत.
त्यांचीच भुनभुन सुरू आहे
– हसमुख