इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
माधवरावांचं जबरदस्त लॉजिक
(माधवराव आणि त्यांची पत्नी शकुंतलाबाई जेवण करीत असताना)
माधवराव – आजचं जेवण सूनबाईंनी बनवलं वाटतं.
शकुंतलाबाई – तुम्हाला ना माझं काहीच कौतुक नाही.
मी रोज बनवते तेव्हा कधी नाही विचारलं.
आणि आज विचारताय…
माधवराव – अगं लाडे, तसं काही नाही.
तू रोज बनवतेस ते माहित आहे मला..
शकुंतलाबाई – मग कसं
माधवराव – अगं, रोज जेवणात पांढरा केस निघतो, पण,
आज काळा केस निघाला ना म्हणून विचारलं..
– हसमुख