इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लॉटरीचे तिकीट आणि आनंद
(स्थळ अर्थातच सदाशिव पेठ, पुणे.)
जोशी काका : काय तात्या, बऱ्याच दिवसांनी दिसलात.
तात्या : हो गावाला गेलो होतो. परवाच आलो.
जोशी काका : आज अगदीच खुशीत दिसताय.
का? काय झालं?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना
चक्क १ लाख रुपयांची लॉटरी लागलीय!
जोशी काका : काय सांगता?
मग तुम्हाला का इतका आनंद झालाय?
तात्या : अहो, पण त्याला आता तिकिटच सापडत नाहीय!
– हसमुख