इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लॉकडाऊन आणि सासुरवाडीचा पाहुणचार
(झुंबरलाल पहिल्यांदाच सासुरवाडीला जातो आणि तेवढ्यात लॉकडाऊन लागते तेव्हा)
जावईबापू पहिल्यांदाच घरी आल्याने
सासुबाईंना प्रचंड आनंद झाला.
त्यांच्यासाठी काय करु आणि काय नाही, असे त्यांना झाले.
त्यातच लॉकडाऊन लागलेले असल्याने
जावईबापूंचे जेवणाचे भरपूर लाड
पुरविण्याचे त्यांनी निश्चित केले.
त्यासाठी सासुबाईंनी मेथीचे नवनवीन आणि विविध पदार्थ
बनवून जावयाला खाऊ घातले. मात्र,
झुंबरलाल आठवडाभरातच कंटाळले.
सगळ्या पदार्थांमध्ये मेथी असल्याने ते फारच वैतागले.
अखेर झुंबरलाल सासुबाईंना म्हणाले,
सासुबाई, मेथीचं शेत कुठं आहे,
एकदा दाखवा तरी.
मी तिकडे जातो आणि
एकदाची मेथी चरुन तरी येतो.
– हसमुख