इंडिया दर्पण – हास्य षटकार – कर्मचारी, रजा आणि साहेब
(कार्यालयात साहेब आणि कर्मचारी यांच्यातील संवाद)
धोंडगे साहेब – अरे दामोदर,
मी सांगितलं
होतं ना की
रजा घ्यायची नाही.
तरीही तू
न सांगता
अचानक
तब्बल ८ दिवस
रजेवर होतास.
दामोदर – साहेब अहो,
लग्न होतं
म्हणून
धोंडगे साहेब – अरे व्वा.
अभिनंदन.
मग,
वहिनींचे
फोटो तरी दाखव
दामोदर – साहेब,
माझं नाही.
तुळशीचं लग्न होतं.
– हसमुख