इंडिया दर्पण – हास्य षटकार – कर्ज
(सखाराम आणि त्याच्या वडिलांमधील संवाद)
वडिल – अरे सखाराम,
आपल्याला कर्ज घ्यायचे आहे.
त्याचा अर्ज तुला
बँकेच्या मॅनेजरकडे
द्यायला सांगितला होता.
तो दिलास का?
सखाराम – बाबा,
मॅनेजरला
काही कळतं का?
त्याच्याकडे
कशाला अर्ज द्यायचा….
वडिल – अरे, काय
बोलतोस तू
सखाराम – मी अर्ज
कॅशिअरकडे दिला.
कारण,
कॅश तर
त्याच्याकडेच
असते ना
हसमुख