इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
लचके काका आणि रखमा काकू यांचा संवाद
(रखमा काकू बाजारात जाण्यासाठी निघाल्या असतात त्याचवेळी)
लचके काका – अगं ए रखमा,
बाजारात जाते आहेस ना…
रखमा काकू – हो हो. का,
काही आणायचे आहे का….
लचके काका – अगं, बाजारात जाताना
खडू बरोबर घेऊन जा
रखमा काकू – खडू अन् तो कशासाठी.
त्याचे काय काम बाजारात…
लचके काका – अगं, सध्या कोरोना सुरू आहे ना.
सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी
दुकानासमोर वर्तुळे काढली आहेत.
तू त्या वर्तुळांमध्ये
मावत नाहीस ना
म्हणून…
– हसमुख