इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जावई जेव्हा सासऱ्याला सांगतो
(जावई सासऱ्याशी बोलत असतो)
जावई – तुम्हाला काय सांगू,
तुमच्या मुलीने माझे जगणेच
मुश्कील केले आहे
(सासऱ्याकडून काही तरी मोठा दिलासा मिळेल
या आशेने जावई सासऱ्याकडे बघतो)
सासरे – अरे बेटा, तु माझा विचार कर.
माझ्या जवळ तर तिची आईच आहे.
(दोघेही एकमेकांकडे किती वेळ बघत बसतात)
– हसमुख