इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरा बायकोचे भांडण
नवरा-बायकोचे कडाडून भांडण होते.
त्यानंतर ते दिवसभर गप्प बसतात.
अखेर सायंकाळी बायको नवऱ्याकडे येते.
बायको – असे भांडण झाल्यावर मला बरे वाटत नाही.
एक काम करूया,
तुम्ही थोडी तडजोड करा, मी थोडी करते.
नवरा – ठीक आहे, काय करू?
बायको – तुम्ही माझी माफी मागा
आणि मी तुम्हाला माफ करते.
– हसमुख