इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पत्नी आणि साडी
रुपेश आणि त्याची पत्नी सुवर्णा
हे बाजारातून जात असतात.
त्याचवेळी
सुवर्णाने एका दुकानासमोर बोर्ड पाहिला
बनारसी साडी १०/-
नायलॉन ८/-
कॉटन ५/- रुपये
हे पाहून सुवर्णाला अतिशय आनंद होतो.
तातडीने ती नवऱ्याला म्हणते, मला ५०० रुपये द्या, मी ५० साड्या घेईन.
हे ऐकून नवऱ्याला हसावे की रडावे असे होते.
अखेर तो म्हणतो, अहो, बिरबलाच्या आई,
ते इस्त्रीचे दुकान आहे.
– हसमुख