इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पती, पत्नी आणि स्वातंत्र्य
एके दिवशी हॉलमध्ये
पती आणि पत्नी बसलेले असतात तेव्हा
पती पुस्तक वाचत असतो.
त्यातील एक वाक्य तो मोठ्याने वाचतो :
एका लेखकाने लिहिले आहे की,
पतींनाही बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे…!!!
हे ऐकून बायको जोरात हसते
आणि म्हणते
बघा, म्हणजे, त्यालाही लिहावेच लागले.
बोलता नाही आले…
– हसमुख