इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरा, बायको आणि बॉयफ्रेंड
लग्नानंतर एक दिवस
नवरा-बायको निवांत गप्पा मारत असतात.
त्यावेळी
अचानक नवऱ्याने विचारले – एक गोष्ट सांग, लग्नापूर्वी तुला किती बॉयफ्रेंड होते?
बायको आत गेली आणि एक पाकिट घेऊन आली.
ज्यामध्ये काही तांदूळ आणि २०० रुपये ठेवले होते.
नवरा – हे काय?
बायको – मी जेव्हा जेव्हा बॉयफ्रेंड बनवायची तेव्हा
या मी पाकिटात तांदळाचा दाणा टाकायची.
हे ऐकून नवऱ्याने तांदळाचे दाणे मोजले.
एकूण सात दाणे बाहेर आले.
नवरा – सात आहेत. काही हरकत नाही.
आजकाल प्रत्येक मुलीकडे एवढे असतात.
पण त्यांनी हे २०० रुपये का ठेवले आहेत?
बायको – चार किलो तांदूळ विकल्याचे!!!
(नवरा बेशुद्ध)
– हसमुख