इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
हॉटेल रुमचे भाडे
(दोन मित्र एका हॉटेलमध्ये जातात तेव्हा)
रमेश आणि सुरेश हे कामानिमित्त बाहेरगावी येतात.
त्यामुळे ते एका हॉटेलात रुम बुक करण्यासाठी जातात.
हॉटेलचा मालक त्यांना रुम दाखवतो.
रुम अतिशय वाईट असते.
रुमची ती अवस्था बघून सुरेश त्या मालकाला चेष्ठेने म्हणतो,
‘या गोठ्याचं भाडं काय?’
मालक अतिशय शांतपणे उत्तर देतो,
‘एका बैलाला एका रात्रीचे शंभर रुपये’…
– हसमुख