इंडिया दर्पण – हास्य षटकार – सोन्याचा प्रामाणिकपणा
(सोन्या एकदा रस्त्याने जात असतो तेव्हा)
सोन्या रस्त्याने जाताना धापकन गटारात पडतो.
रस्त्यावरील नागरिक ते बघतात आणि तातडीने मदतीला धावतात.
सोन्याला गटारीतून बाहेर काढतात. त्याचवेळी…
एक व्यक्ती – का हो, तुम्ही असे अचानक गटारात कसे पडलात
सोन्या – माझ्या प्रामाणिकपणामुळे
दुसरी व्यक्ती – अं कसं काय
सोन्या – सरकारने सांगितले आहे की, सोशल डिस्टन्सिंग पाळा.
त्यासाठी दिलेल्या वर्तुळात उभं रहा.
म्हणून मी प्रामाणिकपणे त्या वर्तुळात उभे रहायला गेलो
आणि थेट गटारात पडलो.
मला वाटलं ते सोशल डिस्टन्सिंगचं वर्तुळ आहे
– हसमुख