इंडिया दर्पण – हास्य षटकार – हिंमतवान मुले की मुली
(एका नामांकीत कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धा सुरू असते.
त्यात विषय असतो हिंमतवान कोण मुले की मुली)
बराच मोठा
वाद-विवाद झाल्यानंतर
सर्वात शेवटी
बंटी उठतो आणि म्हणतो
“मित्रांनो, मुला-मुलींमध्ये
सर्वात हिंमतवान
फक्त मुली आहेत…
सर्व मुले उठून उभे राहतात
आणि रागाने
बंटीला म्हणतात
“बंट्या, कसं काय?”
बंटी म्हणतो,
“मित्रांनो, सर्व मुली या
मुलांसारखे
पँट-टीशर्ट, जीन्स-टीशर्ट
घालून
कॉलेजमध्ये येऊ शकतात.
परंतु मुलांमध्ये मात्र
तेवढी हिंमत नाही की
ते साडी आणि पंजाबी ड्रेस
घालून कॉलेजमध्ये
येऊ शकतात.”
– हसमुख