इंडिया दर्पण – हास्य षटकार – हिअरिंग एड
विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील संवाद
स्थळ अर्थातच सदाशिव पेठ, पुणे
ग्राहक – “हिअरिंग एडचे यंत्र केवढ्याला?”
विक्रेता – २० रुपयांपासून पाच हजारापर्यंत.
ग्राहक – २० रुपयांचे बघू
विक्रेता – हे घ्या.
कानात
एक बटण
आणि
कानातून
शर्टाच्या खिशात
एक वायरचा तुकडा
सोडायचा”.
ग्राहक – “हे कसं काम करतं?”
विक्रेता – २० रुपयाचं यंत्र
काय काम करणार?
पण
ते बघून
सगळे जण
तुमच्याशी
मोठ्याने बोलायला लागतात.”
– हसमुख