इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गुड्डीच्या नखऱ्यांवर बाबांचे उत्तर
(घरात आई, बाबा आणि गुड्डी तिघे बोलत असतात)
गुड्डी – आई मला पटकन
मॅगी करुन दे ना
आई – अगं, रोज रोज काय मॅगी मागते.
दुसरे काही चांगले खा ना.
काय करुन देऊ पोहे की उपमा
गुड्डी – काहीच नको. दुसरे काही तरी दे ना
आई – मातू नको. दुसरे काही देणार नाही.
जे देईल ते गपगुमान खा.
बाबा – अरे, आमच्या लहानपणी दोनच पर्याय असायचे.
एक म्हणजे मार खा किंवा जे मिळेल ते खा.
गुड्डी – बाबा, मग, तुम्ही काय करायचे.
बाबा – बाळा, आम्ही दोन्ही खायचो.
आधी मार आणि त्यानंतर जे वाढलेलं आहे ते खायचो…
– हसमुख