इंडिया दर्पण – हास्य षटकार – गोट्या आणि खेळणी
(गोट्या घरात त्याच्या आईशी बोलत असतो)
गोट्या : आई, पटकन एवढी सगळी खेळणी
पलंगाखाली लपव ना…!!
आई : का रे काय झालं?
गोट्या : अगं माझा मित्र सोन्या येतोय…
आई : मग काय झालं? ते काय खेळणी चोरेल का?
गोट्या : तो चोरणार नाही पण
त्याची खेळणी तर तो ओळखेल ना…!!
– हसमुख