इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तरुण, हॉटेल आणि सुंदर तरुणी
एक तरुण मुलगा हॉटेलमध्ये जातो.
त्याला दिसते की एका टेबलावर सुंदर तरुणी जेवत असते.
ते पाहून तो त्या मुलीच्या दिशेने जातो
तरुण – हॅलो
मुलगी फार लक्ष देत नाही.
तो पुन्हा हॅलो म्हणतो
तरुणी – काय आहे?
तरुण – तुमच्या शेजारची ही सीट रिकामी आहे का?
तरुणी त्याच्याकडे पाहते.
तरुणी – हो रिकामी आहे.
पण त्यावर बसला तर
माझीही सीट रिकामी होईल.
– हसमुख