इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जेव्हा प्रेयसीचा फोन येतो
गणू आपल्या आजीसोबत टीव्ही बघत होता.
त्याचवेळी प्रेयसीने त्याला फोन केला
आणि रोमँटिक पद्धतीने म्हणाली…
प्रेयसी – बघ ना. बाहेर मस्त पाऊस पडतोय.
गणू – हो, बाहेर पाऊस पडतोय
प्रेयसी – तुझा काय प्लान आहे?
गणू – माझा एका महिन्यासाठी 299 चा 2GB डेटाचा प्लॅन आहे.
प्रेयसी – मर तिकडेच. घुस मोबाईलमध्ये. मोबाईलची औलाद.
– हसमुख