इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
भूगोलाच्या शिक्षिका आणि विद्यार्थी
भूगोलाचा विषय शिकवणाऱ्या शिक्षिका
अतिशय हाडकुळ्या होत्या.
या शिक्षिकेची नियुक्ती
एका गावात झाली.
एके दिवशी या शिक्षिकेने
वर्गातल्या विद्यार्थ्यांना
प्रश्न विचारला की, मला सांगा की,
मुलांनो, पृथ्वी का फिरतेय?
एक विद्यार्थी म्हणाला, मॅडम, काहीतरी खात जा.
न जेवता शाळेत आलात तर
पृथ्वी अशीच फिरताना दिसेल.
– हसमुख