इंडिया दर्पण – हास्य षटकार – इंग्रजीच्या शिक्षिका आणि गणू
इंग्रजीच्या शिक्षिका शाळेत शिकवित असतात.
त्याचवेळी त्या गणूला प्रश्न विचारतात
मॅडम : तुझा जन्म कुठे झाला?
गणू : तिरुवनंतपुरम.
मॅडम : ठीक आहे, मला त्याचे स्पेलिंग सांग बरं…
गणू (थोडा वेळ विचार करून) : बहुधा गोव्यात जन्म झालेला असावा.
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011